नवी दिल्ली : देशभरातले कत्तलखाने बंद करण्यात यावेत तसंच मुस्लिमांनी मांस खाऊ नये, असं वक्तव्य समाजवादी पार्टीचे नेते आझम खान यांनी केलं आहे. केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये गोमांसावर कोणतीही बंदी नाही पण इतर राज्यांमध्ये हे बेकायदेशीर आहे. त्यामुळे सगळ्या देशासाठी एकच कायदा हवा अशी मागणी आझम खान यांनी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या सरकारनं सत्तेवर येताच बेकायदेशीररित्या चालत असलेल्या कत्तलखान्यांवर कारवाईचा बडगा उठवला. या कारवाईवरही खान यांनी आक्षेप घेतले आहेत. जनावरं कायदेशीर कत्तलखान्यांमध्ये मारली गेली तर कायदेशीर आणि अवैध कत्तलखान्यांमध्ये मारली गेली तर बेकायदेशीर कशी असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.


मुस्लिमांनी मांस खाऊ नये असा सल्लाही आझम खान यांनी दिला आहे. इस्लाममध्ये मांस खाणं अनिवार्य नाही. मौलवींनी मुस्लिमांनी मांस खाऊ नये असं आवाहन करावं असंही खान म्हणालेत.