मुंबई : बीडीडी चाळीच्या आराखड्याची उत्सुकता सा-यांनाच लागली आहे. या इमारतींचा आराखडा आता फायनल झाले आहे. ५०० स्केअर फूट कारपेट घर मिळण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झी चोवीस तासवर बीडीडी इमारती कशा असतील हे आम्ही तुम्हाला दाखवतोय.. नगर विकास खात्यानं अधिसूचना काढली त्यात ५०० स्केअर फूट कारपेट घर म्हटले आहे. दहा वर्ष कॉर्पस फंड तरतूद असेल. तसंच शाळा, मोकळं मैदान आणि समाज मंदिरासाठी आरक्षण राखीव असेल. 


पूर्ण विकास होईपर्यंत आहे तिथेच ट्रान्सझिट कॅम्प असेल. सहकारी संस्था नोंदणी झाल्यावर रहीवासी घर विक्री करता येईल. मात्र, १९९६ नंतर आता कोणतीही बीडीडी रूम विक्री ग्राह्य धरली जाणार नाही, असे सूचित करण्यात आले आहे.