मुंबई : बेस्ट अध्यक्षपदासाठी शिवसेनेचे नगरसेवक अनिल कोकीळ यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. बेस्टचा कर्मचारी बेस्टचा चेअरमन होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेली ३७ वर्षे बेस्टच्या सेवेत असणारे कोकीळ यांनी निवडणूकीपूर्वी राजीनामा दिला आहे. अनिल कोकीळ परेल-काळाचौकी परिसरातून पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. बेस्ट कामगार सेनेचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.


स्थायी समिती आणि शिक्षण समिती निवड 


दरम्यान, मुंबई महापालिका स्थायी समिती आणि शिक्षण समिती अध्यक्षपदाची औपचारिक निवड होणार आहे. स्थायी समिती अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या रमेश कोरगावरांनी अर्ज भरलाय. मातोश्रीवरुन आलेल्या आदेशानंतर मंगेश सातमकरांचा पत्ता कापत कोरगावकरांनी संधी देण्यात आली होती. 


शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी शीतल म्हात्रेंचं नाव चर्चेत होते. मात्र त्यांच्याऐवजी ऐनवेळी शुभदा गुडेकर यांनी अर्ज दाखल केलाय. ही निवड बिनविरोध होणार असल्याने त्याची औपचारिक घोषणा करण्यात येईल. 


दुसरीकडे सुधार समिती अध्यक्षपद आणि बेस्ट समितीच्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरले जाणार आहेत या दोन्ही समितीच्या अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून कुणाची नावं समोर येतात याकडं नजरा लागल्यात.