मुंबई : रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटनमधील रौप्यपदक विजेती पीव्ही सिंधूच्या विजयी मिरवणुकीची साक्षीदार मुंबईची निलांबरी बस ठरणार आहे.  पी.व्ही. सिंधू हिचे आज मायदेशात आगमन झाले आहे. सिंधूसह तिचा प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांचीही मिरवणूक  हैदराबादेत सुरू झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पार्श्वभूमीवर हैदराबादमध्ये तिच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. हैदराबाद विमानतळापासूनच सिंधू आणि तिचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांची विजयी मिरवणूक काढण्यात येत आहे.


ही मिरवणूक मुंबई बेस्टच्या ताफ्यातील निलांबरी बसमधून काढण्यात येत आहे. तब्बल १६०० किलोमीटरचा प्रवास करुन मुंबईकरांची निलांबरी सिंधूच्या स्वागतासाठी हैदराबादेत पोहोचली आहे.