बेस्ट कर्मचारी संघटनांचा संपाचा इशारा
बेस्टच्या खासगीकरणाविरोधात सर्व पक्ष एकवटलेले असतानाच आता कर्मचा-यांच्या सर्व संघटनाही एकवटल्या आहेत. बेस्टचे खासगीकरण न थांबवल्यास कर्मचारी संघटनांनी सोमवारी संप करणार असल्याचा इशारा दिला आहे.
मुंबई : बेस्टच्या खासगीकरणाविरोधात सर्व पक्ष एकवटलेले असतानाच आता कर्मचा-यांच्या सर्व संघटनाही एकवटल्या आहेत. बेस्टचे खासगीकरण न थांबवल्यास कर्मचारी संघटनांनी सोमवारी संप करणार असल्याचा इशारा दिला आहे.
खासगी बस वाहतूकदारांना एमएमआरडीने मुंबईत सेवा परवानगी दिल्याचे पडसाद उमटू लागले आहेत. शुक्रवारी झालेल्या बेस्ट समितीमध्ये सर्वपक्षीय सदस्यांनी याविरोधात आवाज उठवला.
तसंच सर्वच कर्मचारी संघटनांही आक्रमक झाल्या असून त्यांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.कामगार सेनेचे सुनील गणाचार्य यांनी वेळ पडल्यास सोमवारपासून संपावर जाण्याचा इशारा दिलाय.