मुंबई : प्रतिष्ठेचा समजला जाणारा भारतरत्न पुरस्कार नाट्यक्षेत्रासाठी का नाही? असा सवाल उपस्थित केलाय ज्येष्ठ गीतकार, दिग्दर्शक गुलजार यांनी...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रंगभूमीवरील योगदानासाठी डॉ. विजया मेहता यांना 'भारतरत्न' पुरस्कार दिला जावा, अशी इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केलीय. निमित्त होतं, ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. विजया मेहता' यांच्या जीवनावर आधारित 'बाई... एका रंगपर्वाचा मनोहर प्रवास' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाचा...


मुंबईतल्या यशवंत नाट्यमंदिरात हा सोहळा संपन्न झाला. विजया मेहता यांच्या सोबतच्या आठवणी या पुस्तकात शब्दबद्ध करण्यात आल्यात. नीना कुलकर्णी, रीमा, अमृता सुभाष, अजित भुरे आदींनी बाईंसोबतच्या आपल्या आठवणी यात मांडल्यात. 


यातील काही उताऱ्यांचं वाचनही या कार्यक्रमादरम्यान करण्यात आलं. या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध गीतकार आणि दिग्दर्शक गुलजार, ज्येष्ठ रंगकर्मी महेश एलकुंचवार, विजया राजाध्यक्ष आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. मराठी रंगभूमी दिनाचं औचित्य साधत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.