मुंबई : महाराष्ट्रातील गावांमध्ये महसूल विभागाचं काम अधिक सुरळीत व्हावे या उद्देशाने राज्याच्या महसूल विभागाने सर्वात मोठी तलाठी भरती करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.  १९८४ सालानंतर पहिल्यांदाच तलाठी पदांसाठी मोठी भरती केली जाणार आहे. राज्यभरात एकूण ३ हजार ८४ नव्या तलाठ्यांची भरती करण्याचा निर्णय राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आहे.


निर्णयाची वैशिष्ट्ये 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


- राज्यात नव्याने ३०८४ तलाठी साजे वाढविण्याची राज्य सरकारचा निर्णय
- त्यासाठी ३०८४ तलाठ्यांची भरती करणार 
- आता सहा गावांना एक तलाठी मिळणार
- गावातील लोकांनाही कामांसाठी तलाठी सहज उपलब्ध होणार
- राज्यात एकूण १२३२७ तलाठी साजे आहेत आता त्यात वाढ केल्यामुळे १५४११ एकूण तलाठी साजे होतील
- तलाठ्यांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी निर्णय
- येणा-या मंत्रीमंडळ समितीत याबाबतचा प्रस्ताव मांडणार
- विभागीय संख्या किती असावी याचा आराखडा उपसमितीने तयार केला आहे
- जिल्हा स्तरावर किती साजे असावेत याची संख्या विभागीय आयुक्त ठरवाणार
- त्यानंतर तालुका स्तरावर किती साजे असावेत याची संख्या तहसिलदार ठरवणार
- १९८४ सालानंतर साजे संख्या वाढवली जात आहे 
- २०१७ सप्टेंबरमध्ये  ३०८४ तलाठी पदे भरण्यासाठी प्रक्रिया सुरू करणार


- कोकण विभाग आता १३९१ साजे त्यात ७४४ वाढ करून ते २१३५ करणार