मुंबई : पाचशे आणि हजारांच्या नोटा बंद केल्यानंतर मुंबईत पेट्रोल पंपांवर प्रचंड गर्दी होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सगळ्याच लोकांना पेट्रोल भरून पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा संपवायच्या होत्या. कित्येक पेट्रोल पंपांवर ग्राहकांना देण्यासाठी सुट्टे पैसेच उरले नाहीत, त्यामुळे पेट्रोल पंप बंद करावे लागले. 


तर काही ठिकाणी फक्त पाचशे आणि हजार रुपयांचंच पेट्रोल मिळेल, असे बोर्ड लावण्यात आले. मुंबईकर रात्रभर पेट्रोल भरण्यासाठी फिरत होते.