मुंबईत हे दिग्गज झाले पराभूत
मुंबई महापालिकेत सत्तेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच झाली. शिवसेनेला ८४ जागा तर भाजपला ८२ जागा मिळाल्या. काँग्रेसने ३१ जागांवर यश मिळवलं. २७ जागांवरून ७ जागांवर आलेल्या मोठा फटका मनसे बसला.
मुंबई : मुंबई महापालिकेत सत्तेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच झाली. शिवसेनेला ८४ जागा तर भाजपला ८२ जागा मिळाल्या. काँग्रेसने ३१ जागांवर यश मिळवलं. २७ जागांवरून ७ जागांवर आलेल्या मोठा फटका मनसे बसला.
ठासून नाही घासून झालेल्या या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे.
या बिग शॉट उमेदवारांना शॉक...
– विनोद शेलार – भाजप (आशिष शेलार यांचा भाऊ)
– प्रवीण छेडा – काँग्रेस (विरोधी पक्षनेते)
– यशोधर फणसे – शिवसेना (स्थायी समिती अध्यक्ष)
– मंगेश सांगळे – भाजप (मनसेचे माजी आमदार)
– तृष्णा विश्वासराव – सभागृह नेत्या
– कामिनी शेवाळे – शिवसेना (खासदार राहुल शेवाळे यांची पत्नी)
– देवेंद्र आंबेरकर – शिवसेना (माजी विरोधी पक्षनेता)
– निकिता निकम – काँग्रेस (माजी विरोधी पक्षनेते ज्ञानराज निकम यांच्या कन्या)
– तेजस्विनी आंबोले – भाजप (नाना आंबोले यांच्या पत्नी)
– स्वप्ना देशपांडे – मनसे (संदीप देशपांडे यांच्या पत्नी)