मुंबई : कफ परेडच्या नेव्हीनगर येथील नोफ्रा भागात मतदारांना पैसे वाटताना भाजपच्या कार्यकर्त्यांना शिवसैनिकांनी रंगेहाथ पकडले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रकरणी निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून एफआयआर दाखल करण्यात आलाय. पैसे वाटपाचा हा सर्व प्रकार प्रभाग क्रमांक 227 मध्ये घडला. 


या प्रभागातून भाजपच्या मकरंद नार्वेकर निवडणूक लढवत असून भाजप कार्यकर्त्यांकडे त्यांच्या नावाचे प्रचार साहित्य आढळून आलंय. प्रत्येक घरात जावून भाजपचे कार्यकर्ते कुटुंबातीला सर्व व्यक्तींची नावे नोंद करून सही घेत होते. 


तसंच व्यक्तींच्या संख्येनुसार पैसे वाटप करत होते असा आरोप करण्यात येतोय. पैसे वाटप करणा-यांमध्ये भाजपची एक महिला कार्यकर्ता होती. जिच्या पर्समध्ये दोन हजार रूपयांच्या नोटांचा गठ्ठा मिळाल्याचंही सांगण्यात आलंय.  या प्रभागातून सेनेचे अरविंद राणे रिंगणात आहेत.