मुंबई : महानगरपालिका जागावाटपा संदर्भात भाजप आणि मित्रपक्षांची मुंबईतल्या रंगशारदामध्ये रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती. बैठकीला भाजप मुंबई अध्यक्ष अशिष शेलार, आरपीआय कडून अविनाश महातेकर, शिवसंग्रामचे विनायक मेटे, तर रासपचे महादेव जानकर यांच्यावतीनं रासपचे पदाधिकारी उपस्थित होते.


आरपीआयसाठी रामदास आठवले यांच्याकडून या बैठकीत ६५ जागांचा प्रस्ताव मांडला गेला. सर्व मित्रपक्षांनी भाजपच्याच चिन्हावर निवडणूक लढण्याचा प्रस्ताव यावेळी भाजपनं ठेवला. त्याला आरपीआयनं नकार दिला. तर इतर मित्रपक्षांनी याबाबतची आपली भूमिका दोन दिवसांत स्पष्ट करणार असल्याचं सांगितलं. शिवसेनेसोबतची पालिका निवडणुकीकरताची युती तुटल्यानंतर मित्रपक्षांना एकत्र करत, भाजप आपला मुंबईतला खुंटा मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे.