भाजपचे विधानपरिषदेचे उमेदवार जाहीर
विधान परिषदेच्या दहा जागांसाठी होणार निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपले चार उमेदवार जाहीर केले आहे.
मुंबई : विधान परिषदेच्या दहा जागांसाठी होणार निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपले चार उमेदवार जाहीर केले आहे.
यात प्रविण दरेकर, सदाभाऊ खोत, विनायक मेटे आणि सुजीत सिंग ठाकूर यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. अजून पाचव्या नावाची उत्सुकता असून कोणाची वर्णी लागते याकडे लक्ष लागले आहे.
या चार नावातून महाराष्ट्रात आगामी काळात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागण्याची शक्यता आहे. कोणाची लॉटरी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.