मुंबईमध्ये भाजपनं दिले 120 मराठी उमेदवार
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपनं 192 पैकी 120 उमेदवार मराठी दिले आहेत.
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपनं 192 पैकी 120 उमेदवार मराठी दिले आहेत. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ही माहिती दिली आहे. याबरोबरच उरलेले 72 उमेदवार हे अन्य भाषिक मुंबईकर असल्याचं ते म्हणाले आहेत. भाजपनं दिलेल्या उमेदवारांपैकी 89 उमेदवार हे पदवीधर आहेत. मुंबईसाठी भाजपनं सर्वात सुशिक्षित उमेदवार दिल्याचा दावाही आशिष शेलार यांनी केला आहे.
मुंबई महापालिकेसाठी भाजपनं आरपीआय, रासप आणि शिवसंग्रामबरोबर युती केली आहे. मुंबईमध्ये भाजप 192 जागा लढणार आहे, तर आरपीआयला 25, रासपला 6 आणि शिवसंग्रामला 4 जागा मिळणार आहेत.