मुंबई :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर फेकू आरोप केले यावर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी चांगला समाचार घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जे दिवसभर चित्रपट बघतात ते अशी डायलॉगबाजी करतात, येत्या जाहिरनाम्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रपटगृह तयार करून आणि ते  राज ठाकरेंना समर्पित करू अशी टीका शेलार यांनी केली आहे. 


बाळासाहेबांच्या स्मारकाला भाजपचा पाठिंबा 


बाळासाहेबांच्या स्मारकाला भाजपचा विरोध हा राज ठाकरे यांचा जावईशोध आहे. 
बाळासाहेबांचे स्मारक व्हावे ही आमची भूमिका आहे, तसं आम्ही जाहिरनाम्यात म्हटलेही आहे. स्मारकाचा बाजूने आम्ही आहोत, त्या स्मारकाला मनसेचाच विरोध असल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले. 


दरम्यान, भाजपची उमेदवारी ज्यांना मिळाली ही लिस्ट ज्यांनी लिक केली त्यांच्यावर कारवाई करू असेही त्यांनी सांगितले.