मुंबई : राज्यात या निवडणुकीत बाजी मारेल आणि एक नंबर भाजप राहिल, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दावा केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात 25 जिल्हापरिषद आणि 10 महापालिकांसाठी निवडणूक झाली. मुख्यमंत्री, मी, पालकमंत्री, मंत्री, आमदार, कोअर ग्रुप असे सर्व नेते प्रचार करण्यासाठी फिरलेत. 6 महानगरपालिकामध्ये भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करेल. मुंबई, पुणे , नाशिक , नागपूर , अमरावती, सोलापूर पालिका या सहा ठिकाणी भाजपला बहुमत मिळेल. इतर ठिकाणी आमच्या शिवाय सत्ता येणार नाही, असा दावा दानवे यांनी केला आहे.


मुंबईत आम्ही गेल्यावेळी 62 जागा लढलो होतो. आता युती होऊ शकली नाही, आमचे शिवसेनेशी वैचारिक मतभेद नाहीत. काही मुद्द्यांवर युती होऊ शकली नाही. मुंबईतही आम्ही स्वबळावर येऊ, असे दानवे म्हणालेत.निवडणुकीत यश मिळो किंवा अपयश येवो, ही जबाबदारी सर्वांची असेल. एकत्रितरित्या आम्ही काम केले आहे. 2012 पेक्षा जास्त जागा निवडून येतील आणि आम्ही राज्यात एक नंबचचा पक्ष म्हणून समोर येऊ, अशी स्थिती आहे. उद्या काय होतेय यावर पुढच सगळं ठरेल, असे दानवे म्हणालेत.