मुंबईकरांसाठी भाजपचा नवा मेन्यू
शिवसेनेचा शिववडा आणि काँग्रेसच्या कांदेपोह्यांनंतर आता भाजपनं नमो टी स्टॉल काढण्याची कल्पना मांडली आहे.
मुंबई: शिवसेनेचा शिववडा आणि काँग्रेसच्या कांदेपोह्यांनंतर आता भाजपनं नमो टी स्टॉल काढण्याची कल्पना मांडली आहे. भाजप गटनेत्यांच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
सुधार समिती अध्यक्ष प्रकाश गंगाधरेंनी हा प्रस्ताव मांडला. बेरोजगारांना चालवण्यासाठी हे स्टॉल्स देण्याची संकल्पना आहे. नमो टी स्टॉलसोबत नमो फूड स्टॉलदेखील उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावाला गटनेत्यांच्या बैठकीत तत्वतः मंजुरी देण्यात आली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेऊन भाजपची ही नवी रणनिती असल्याचं बोललं जात आहे.