मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पश्चिम रेल्वेमार्गावर अंधेरी - गोरेगावच्या दरम्यान जवळपास पूर्ण होत आलेल्या ओशिवरा स्थानकावरून श्रेयवादाची लढाई होणार, अशी चिन्हं दिसू लागलीत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पश्चिम रेल्वेवरील ओशिवरा स्थानकाचं लवकरच उद्घाटन अपेक्षित आहे. पण त्याआधीच भाजप आणि सेनेत श्रेयावरून चढाओढ सुरू झालीय. याच पार्श्वभूमीवर मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज या रेल्वे स्थानकाची पाहणी केली. 


अनेक वर्षांपासून ओशिवरा रेल्वे स्टेशनचे काम रखडलं होतं. मात्र, गेल्या दोन वर्षात हे काम पूर्णत्वाकडे नेलं गेलं, असा दावा शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी केलाय. 


याला शह देण्यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरु आहेत. हा दावा खोडून काढण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु झालेत, असं शेलारांच्या भेटीनंतर दिसून येतंय. गेल्या काही दिवासांपूर्वी भाजप राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनीही या रेल्वे स्थानकाला भेट दिली होती. 


नावाचाही वाद... 
या स्थानकाला नाव काय द्यायचं? यावरूनही भाजप आणि सेनेमध्ये मतभेद आहेत. त्यामुळे ओशिवरा रेल्वे स्थानवरुन सेना-भाजपमध्ये वाद पेटणार असं दिसतंय.