मुंबई : भाजपने मुंबई महानगर पालिका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे संकेत दिले आहेत. भाजप-शिवसेना युती होईल की माहित नाही, तुम्ही कामाला लागा असा आदेश आज कार्यकर्ता मेळाळ्यात दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई पालिका निवडणुकीत युती होईल की माहित नाही. मात्र, या सगळ्याकडे लक्ष न देता ही निवडणूक जिंकण्याच्या इराद्यानेच कामाला लागा, असे स्पष्ट फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना बजावले.


भाजपला कोणीही रोखू शकणार नाही!


शिवसेनेशी समझोता न झाल्यास भाजप स्बळावर लढण्यासाठी सज्ज असल्याचे स्पष्ट झाले. कार्यकर्त्यांनी स्थानिक प्रभागांवर लक्ष केंद्रीत करावे. प्रत्येक बुथवरील कार्यकर्त्याने आपली जबाबदारी पार पाडल्यास २०१७ च्या निवडणुकीत भाजपला कोणीही रोखू शकणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 


सेनेमुळे मुंबईकरांचे हाल


मुंबई पालिकेतील शिवसेनेच्या कारभारामुळे मुंबईकरांची दुरावस्था झाल्याची टीका यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. भाजप सत्तेवर आल्यास पायाभूत वाहतूक आणि अन्य सुविधांचे जाळे निर्माण करून मुंबईकरांचे जीवन सुखकर करू, असे आश्वासनही फडणवीस यांनी दिले.


शिवसेना राक्षस : शेलार


मुंबईचा पुढील महापौर भाजपचाच असेल, अशा घोषणांनीही कार्यकर्त्यांनी सभागृह दणाणून सोडले. यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार सूचकपणे मौन बाळगून होते. तर शेलार यांनी आपल्या भाषणात शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचा उल्लेख राक्षस असा केला. या राक्षसाला टीका करून मोठे करून नये. त्याऐवजी त्याला बाटलीत बंद करा, असा शेलार यांनी कार्यकर्त्यांना सल्ला दिला.