मुंबई : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेकजण भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. हाच धागा पकडून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मित्रपक्ष भाजपला टोला लगावला आहे. भाजपचा भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस होऊ नये अशी कोपरखळी त्यांनी लगावली आहे.