मुबंई : राज्यातील खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळी-पिवळी चालकांना मुख्यमंत्र्यांनी दिलासा दिला आहे. आता बारा अधिक एक (१२+१) वाहतूक करण्यास परवानगी देण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बारा अधिक एक क्षमता वाढीबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच काळी-पिवळी वाहतुकीवर होणाऱ्या कारवार्इंना स्थगिती देण्यात आल्याची माहिती आमदार अनिल गोटे यांनी दिली़.


राज्यातील काळी-पिवळी प्रवासी वाहतूक करण्यास सध्या ६+१ अशी प्रवासी वाहतूक मर्यादा लागू आहे. प्रवासी वाहतुकीची क्षमता वाढविण्याची मागणी टॅक्सी चालक-मालक संघटनांनी सातत्याने केली होती़. या मागणीचा विचार करुन तसा प्रस्ताव सादर करण्यास सांगण्यात आलेय.