ऑन ड्यूडी क्रिकेट खेळणारे अभियंते आयुक्तांकडून क्लीन बोल्ड
ऑन ड्यूटी क्रिकेट खेळल्याप्रकरणी मुंबई महापालिकेचे अभियंते अडचणीत आले आहेत.
मुंबई : ऑन ड्यूटी क्रिकेट खेळल्याप्रकरणी मुंबई महापालिकेचे अभियंते अडचणीत आले आहेत. या अभियंत्यांच्या चौकशीचे आदेश मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहतांनी दिले आहेत. उपायुक्त आनंद वागराळकर यांना चौकशी करून रिपोर्ट सादर करायला अजोय मेहतांनी सांगितलं आहे.
मुंबईकर खड्ड्यांमुळे त्रस्त झालेले असताना अभियंत्यांना खड्डे बुजवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र या अभियंत्यांना मुंबईच्या जनतेशी काहीही सोयरसुतक नसल्य़ाचं स्पष्ट झालंय. कारण आज सोमवार असतानासुद्धा महापालिकेचं जी नॉर्थ कार्यालयात ओस पडलं होतं. हे सर्व महाशय आपली ड्यूटी सोडून चक्क दादरच्या ऍन्टिनो डिसिल्व्हा शाळेत क्रिकेट खेळायला गेले. अभियंते कर्मचारी सर्वच क्रिकेट खेळण्यात दंग होते.