मुंबईत चिठ्ठी टाकून लागणार निर्णय.... पाहा कोणाचं लक फळफळणार
मुंबईच्या निवडणुकीत सर्वात चुरशीची आणि उत्कंठा वाढविणारी लढत ठरली आहे वॉर्ड क्रमांक २२० ची. यात भाजपचे अतुल शहा आणि सुरेंद्र बागल यांना समसमान मते पडली. त्यामुळे येथे फेरमोजणी झाली. यावेळीही समान मते असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे चिठ्ठीवर भवितव्य ठरविण्यात येणार आहे.
मुंबई : मुंबईच्या निवडणुकीत सर्वात चुरशीची आणि उत्कंठा वाढविणारी लढत ठरली आहे वॉर्ड क्रमांक २२० ची. यात भाजपचे अतुल शहा आणि सुरेंद्र बागल यांना समसमान मते पडली. त्यामुळे येथे फेरमोजणी झाली. यावेळीही समान मते असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे चिठ्ठीवर भवितव्य ठरविण्यात येणार आहे.
मुंबईतील २२७ पैकी २२६ जागांचे जवळजवळ निकाल लागले असून अखेरचा वॉर्ड म्हणून २२७ राहिला असून दोघांनाही ५९४६ मते पडली आहेत. त्यामुळे आता चिठ्ठी टाकून उमेदवाराला घोषीत करण्यात येणार आहे.
सध्या या वॉर्ड मोठा तणाव निर्माण झाला असून शिवसेना भाजपचे वरिष्ठ नेते या ठिकाणी पोहचले आहे. आता महापालिका आयुक्तांची वाट पाहिली जात आहे. ही चिठ्ठी महापालिका आयुक्तांसमोर टाकली जाते. त्यानंतर निर्णय जाहीर करण्यात येतो.