मुंबई महापालिका शाळेत आता सूर्यनमस्कार करणे सक्ती
मुंबई महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना आता प्रार्थनेच्या वेळी सूर्यनमस्कार करणे सक्तीचे करण्यात आले आहे.
मुंबई : मुंबई महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना आता प्रार्थनेच्या वेळी सूर्यनमस्कार करणे सक्तीचे करण्यात आले आहे.
भाजप नगरसेविका समिता कांबळे यांनी यासंदर्भातील ठरावाची सूचना मांडली होती, ती मंजूर करण्यात आली आहे. या ठरावाला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे तसेच सपाचा विरोध होता. मात्र तो डावलून शिवसेना-भाजपने ही सूचना मंजूर करुन घेतली.
मुंबई महापालिका सभागृहात ठरावाची ही सूचना मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रार्थनेच्या वेळी सूर्यनमस्कार करणे सक्तीचे झाले आहे.