मुंबई : महापालिका स्थायी समितीसह सर्व अध्यक्षपदांची निवडणूक बिनविरोध होणार असली, तरी आयत्या वेळी मातोश्रीवरून आलेल्या आदेशांमुळं नावांची अदलाबदल झाली. त्यामुळे मंगेश सातमकर आणि शीतल म्हात्रे यांचा पत्ता कापला गेला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी मंगेश सातमकरांना तयारी करायला सांगण्यात आलं होतं. त्यानुसार त्यांची तयारी पूर्ण झाली होती. मात्र ऐन वेळी मातोश्रीवरून आदेश आले आणि सातमकरांचा पत्ता कापला गेला. त्यांच्याऐवजी रमेश कोरगावकरांना अर्ज भरण्याच्या सूचना देण्यात आल्या.


साडेसात वर्षांपूर्वी अशाच प्रकारे मंगेश सातमकरांचा पत्ता आयत्या वेळी कापण्यात आला होता आणि राहुल शेवाळेंना अध्यक्षपद देण्यात आलं होतं. त्याचप्रमाणं शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी शीतल म्हात्रेंचं नाव चर्चेत होतं. मात्र त्यांचं नावदेखील कट झाले.


शीतल म्हात्रे यांच्याऐवजी शुभदा गुडेकरांचं नाव शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी निश्चित करण्यात आलंय. सातमकरांनी मात्र संधी हुकल्यामुळं नाराज नसलो तरी वाईट वाटल्याची प्रतिक्रिया झी 24 तासशी बोलताना व्यक्त केली.