मुंबई : मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या 'कोल्ड प्ले' या ब्रिटीश बँड कार्यक्रमासाठी आचारसंहीता लागू व्हावी या मागणीसाठी मुंबई कॉंग्रेसचं शिष्टमंडळ आज राज्य निवडणूक आयोगाला भेटलं.


 मुंबईच्या एमएमआरडीए मैदानावर हा कार्यक्रम होतोय, ज्यात मुख्यमंत्री आणि पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. एकीकडे राज्यातील अनेक शहरात नगरपालिका निवडणुकींची आचारसंहिता आहे. त्यामुळे यी कार्यक्रमात यांची भाषणे झाली तर आचारसंहितेचा भंग होईल. 
 
 सरकारकडून या कार्यक्रमाचा राजकिय वापर केला जावू शकतो, म्हणून हा कार्यक्रम पुढे ढकलावा अशी मागणी संजय निरुपम यांनी केलीय. सोबतच या कार्यक्रमाच्या मंचावर कुठल्याही राजकीय नेत्याचं भाषण होवू नये अशी भूमिकाही निरुपम यांनी व्यक्त केली आहे.