ख्यातनाम व्यंगचित्रकार वसंत सरवटे यांचं निधन
ख्यातनाम व्यंगचित्रकार वसंत सरवटे यांचं निधन झालं आहे. संध्याकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमाराला मुंबईतल्या विलेपार्ले इथल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मुंबई : ख्यातनाम व्यंगचित्रकार वसंत सरवटे यांचं निधन झालं आहे. संध्याकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमाराला मुंबईतल्या विलेपार्ले इथल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर रविवारी अंधेरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
3 फेब्रुवारी 1927 रोजी कोल्हापूरमध्ये जन्मलेले वसंत सरवटे व्यवसायानं सिविल इंजिनियर होते. वयाच्या सतराव्या वर्षापासून त्यांनी व्यंगचित्रं काढायला सुरुवात केली होती. नानाविध विषयांवर व्यंगचित्रं रेखाटलेल्या वसंत सरवटे यांनी दिवाळी अंकांची मुखपृष्ठही रेखाटली होती. 2009 मध्ये त्यांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कार्टूनिस्टतर्फे जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.