मुंबई : एमसीएक्स-एसएक्सला मंजुरी दिल्याप्रकरणी सीबीआयने मुंबईत नऊ ठिकाणी छापे घातले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

MCX, MCX-SX आणि FTILचे प्रमोटर जिज्ञेश शाह आणि या कंपनीचे माजी अधिकारी जोसेफ मैसी यांच्या कार्यालयावरही छापे घालण्यात आले आहेत. 


2013मध्ये FTIL कंपनीच्या MCX स्टॉक एक्स्चेंजला परवाना देण्यात आला होता. मात्र परवाना देण्याच्या प्रक्रियेत घोळ झाल्याचा संशय सेबी आणि सीबीआयनं व्यक्त केलाय. त्यामुळं याप्रकरणी हे छापा सत्र सुरू आहेत.
 
याप्रकरणी सीबीआयनं 2013मध्ये गुन्हा दाखल केला होता. यात जिज्ञेन शाह, FTIL आणि सेबीच्या काही अधिका-यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा याप्रकरणी कारवाईच्या हालचाली सुरू झाल्या असून या कंपनीशी संबंधीत मालमत्ता आणि कार्यालयांवर छापा टाकण्यात आला आहे.