सेलिब्रिटींचं मतदान : मतदारांना केलं मतदानाचं आवाहन
10 महापालिका आणि 11 जिल्हापरिषदांसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. सकाळी साडे सात ते साडे पाच पर्यंत मतदानाची मुदत आहे. जवळपास तीन कोटींहून अधिक मतदार आपला हक्क बजावणार आहेत.
मुंबई : 10 महापालिका आणि 11 जिल्हापरिषदांसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. सकाळी साडे सात ते साडे पाच पर्यंत मतदानाची मुदत आहे. जवळपास तीन कोटींहून अधिक मतदार आपला हक्क बजावणार आहेत.
मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे, पिंपरी-चिंचवड, उल्हासनगर, अमरावती, अकोला येथे मतदान सुरू झालंय. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगानं विशेष प्रयत्न केले आहेत. सेलिब्रिटीही आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. त्यांनी देखील नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
माजी क्रिकेटर संदीप पाटील, अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी देखील आज आपला मतदानाचा अधिकार बजावला.
टीना अंबानी यांनी देखील कुलाबा येथे केलं मतदान