रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली

मध्य रेल्वेच्या कळवा-मुंब्रा स्थानकादरम्यान रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरची वाहतूक खोळंबली आहे.
मुंबई : मध्य रेल्वेच्या कळवा-मुंब्रा स्थानकादरम्यान रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरची वाहतूक खोळंबली आहे.
मध्य रेल्वेवर पुन्हा एकदा वाहतूकीचा खोळंबा झालाय. ऐन घरी जाण्याच्या वेळेतच वाहतूक खोळंबल्याने मोठी गर्दी स्थानकांवर पाहायला मिळते आहे. उपनगरातील प्रवाशांना आज पुन्हा एकदा मध्य रेल्वेचा हा खोळंबा सहन करावा लागतोय. सीएसटी कडून कल्याणकडे जाणाऱ्या मार्गावरच रुळाला तडा गेल्याने याचा प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. स्लो लाईनवरची वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात आली आहे.