मध्य रेल्वेमार्गावर 13 वाढीव फेऱ्या सुरू होणार
आर्थिक वर्ष संपता संपता रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी गेल्यावर्षीच्या अर्थसंकल्पात घोषित झालेल्या लोकलच्या फेऱ्यांमधली वाढ लागू होण्यास 19 मार्चचा मुहूर्त मिळणार आहे.
मुंबई : आर्थिक वर्ष संपता संपता रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी गेल्यावर्षीच्या अर्थसंकल्पात घोषित झालेल्या लोकलच्या फेऱ्यांमधली वाढ लागू होण्यास 19 मार्चचा मुहूर्त मिळणार आहे.
दोन दिवसांमध्ये मध्य रेल्वेच्या कुर्ला ते कल्याण आणि कल्याण ते कसारा आणि कल्याण ते कर्जत मार्गावरील प्रवाशांसाठी 13 वाढीव फेऱ्या सुरू होणार आहेत.
त्यामुळे गर्दीच्या वेळी प्रवास काहीसा सुकर होईल अशी आशा आहे. फेऱ्या वाढणार असल्यानं वेळापत्रकाही बदल होईल. काही अस्तित्वात असणाऱ्या गाड्यांचा विस्तारही करण्यात आलाय.