मुंबई : मनी लाँडरींग प्रकरणी अटकेत असलेले छगन भुजबळ उपचारांसाठी जेजे रुग्णालयातच राहणार की आर्थर रोडमध्ये त्यांची रवानगी केली जाणार याचा फैसला 15 डिसेंबरला होणार आहे. सध्या जेजे रुग्णालयात असलेल्या भुजबळांची प्रकृती ठणठणीत आहे. त्यामुळे त्यांची रवानगी तात्काळ आर्थर रोड तुरुंगात करावी अशी मागणी अंजली दमानिया आणि ईडीच्या वकिलांनी मुंबई सत्र न्यायालयातल्या इडी कोर्टाकडे केलीय.


दरम्यान भुजबळ यांची एंजियोग्राफी टेस्ट करायची असल्याचं भुजबळांच्या वकिलांनी इडी कोर्टाला सांगितलं. या टेस्टसाठी भुजबळांची लेखी परवानगी आवश्यक आहे. मात्र गेले महिनाभर भुजबळ या टेस्टसाठी लेखी परवानगी देत नसल्याचं भुजबळांचे वकील म्हणाले. तसंच आर्थर रोड जेलचे अधिकारी आणि जेजेचे डीन डॉक्टर तात्याराव लहाने यांच्याबाबत कोर्ट काही कठोर निर्णय घेणार का, हे सुद्धा 15 डिसेंबरलाच स्पष्ट होणार आहे.