छगन भुजबळ यांना अटक होण्याची शक्यता?
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ यांना अटक होण्याची शक्यता आहे.
मुंबई : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ यांना अटक होण्याची शक्यता आहे. परदेशातून परतताच भुजबळ यांना अटक होणार, अशी सूत्रांची माहिती आहे.
भुजबळ कुटुंबीयांकडून ८४० कोटी रुपयांचा घोटाळ करण्यात आल्याचा आरोप ठेवण्यात आलाय. त्यानुसार ईडीने कारवाई सुरु केलेय. त्यानुसार समीर भुजबळ यांना अटक करण्यात आलेय. ते सहकार्य करीत नसल्याचे ‘ईडी’च्या अधिकार्यांनी म्हटलेय. दरम्यान, याप्रकरणी भुजबळ कुटुंबीयांसह त्यांच्या मालकीच्या विविध कंपन्यांमधील पदाधिकारी, त्यांच्या संपर्कातील व्यक्तीदेखील चौकशीच्या फेर्यात अडकणार असल्याचे ‘ईडी’मधील सूत्रांनी म्हटले आहे.
दरम्यान, समीर भुजबळ यांचे काका छगन भुजबळ आणि त्यांचा मुलगा पंकज यांनादेखील या प्रकरणात अटक होण्याची शक्यता आहे. छगन भुजबळ सध्या अमेरिकेत असून मुंबईत परतताच त्यांना ताब्यात घेतले जाऊ शकते, असे ईडीतील सूत्रांनी सांगितले.
महाराष्ट्र सदन बांधकाम, कलिना येथील मध्यवर्ती ग्रंथालयाच्या इमारतीचे बांधकाम, अंधेरी आरटीओ प्रकरण, मुंबई-नाशिक हायवे टोल, वांद्रे येथील एमआयजी कॉलनी, नवी मुंबईतील हेक्स वर्ल्ड गृहप्रकल्प आदी प्रकल्पांतून भुजबळ कुटुंबीयांनी सुमारे ८४० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. यापैकी १४४ कोटींची मालमत्ता शासनजमा करण्यात आली आहे.
यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश देताच ईडीने मनी लॅण्डरिंग कायद्याअंतर्गत समीर भुजबळ यांना अटक केली. अटक करण्याआधी ईडीने समीर यांना तीन वेळा समन्स बजावले होते. मात्र ते चौकशीसाठी हजर झाले नाहीत, असे ईडीकडून सांगण्यात आले.