मुंबई : शेतकरी कर्जमाफीसाठी दिल्लीदरबरी गेलेल्या मुख्यमंत्री आणि शिवसेना नेत्यांच्या शिष्टमंडळावर विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विखे पाटील यांनी कडाडून टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची निराशा केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रदान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत गेलेल्या या शिष्टमंडलाला वेळही दिला नाही तर अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडून केवळ आश्वासनं मिळाल्यानं सत्ताधा-यांनी केवळ कर्जमाफीचा फर्स केल्याचं विखे पाटील म्हणालेत.


आज अर्थसंकल्प मांडला जाण्याच्या दिवशीही विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. शेतकरी कर्जमाफीची मागणी कऱणाऱ्या घोषणा विरोधक देत होते. शिवसेनेलाही विखेंनी धारेवर धरले आहे. शिवसेना ही दिल्लीला जाण्याच्या नाटकातलं पात्र असल्याचं ते म्हणालेत. शिवाय आजच्या अर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा न झाल्यास शिवसेना सरकारमधून बाहेर पडेल का असा सवाल त्यांनी शिवसेनेला विचारला आहे.


विखे-पाटील ठळक मुद्दे


- मुख्यमंत्री मोठ्या अविर्भावात दिल्लीला गेले
- पण केंद्राने पाने पुसण्याचा काम।केलं
- शेतकऱ्यांचा विश्वासघात केला
- पंतप्रदाहनांनी या शिष्टमंडळाला वेळ दिली नाही
- आणि अर्थमंत्र्यांकडून फक्त आश्वासन मिळालं
- कर्जमाफीचा फार्स आहे
- शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा काम
- शिवसेनेचा हेतू प्रामाणिक नाही , दिल्लीला जाण्याचं नाटक झालं त्यातील एक पात्र शिवसेना आहे
- आज जर कर्जमाफीची घोषणा नाही झाली तर ते शिवसेना सरकार मधून आज बाहेर पडेल का?