मुलुंडमध्ये साचलेल्या पाण्यात खेळणाऱ्या मुलाचा बुडून मृत्यू
मुलुंडमध्ये साचलेल्या पाण्यात खेळणारी दोन मुलं नाल्यात वाहून गेली. यातील एका मुलाचा बुडून मृत्यू झालाय तर एकाला वाचवण्यात नागरिकांना यश आले. काल रात्री मुलुंडमधील अमरनगर भागात ही दुर्घटना घडली.
मुंबई : मुलुंडमध्ये साचलेल्या पाण्यात खेळणारी दोन मुलं नाल्यात वाहून गेली. यातील एका मुलाचा बुडून मृत्यू झालाय तर एकाला वाचवण्यात नागरिकांना यश आले. काल रात्री मुलुंडमधील अमरनगर भागात ही दुर्घटना घडली.
अफताब सय्यद आणि अरबाज अन्सारी अशी या मुलांची नावं आहेत. हे दोघे पावसानं साचलेल्या पाण्यात खेळत असताना तीन फूट खोल गटारात वाहून गेले. अफताब गटारात वाहून जात असलेला पाहून अरबाज ने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु तो ही वाहून जावू लागला.
अरबाजच्या हातात गटारातून जाणारी केबल वायर आल्याने तो वाचला परंतु आफताबचा मात्र या गटारात बुडून दुर्दवी मृत्यू झाला आहे. अरबाजवर सध्या सायन येथील टिळक रुग्णालयात उपचार सुरू आहे. परंतु या घटनेने विभागातील रहिवाश्यांनी पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.