मुंबई  : होळी खेळायला सर्वांना आवडतं, आपला चेहरा रंगाने माखला जातो, काही रंगात केमिकल्स असल्याने, असे रंग निघण्यास त्रास होतो आणि चेहऱ्याच्या स्कीनलाही ते धोकायदायक असते, अशा वेळी काही नैसर्गिक स्क्रब वापरल्यास चेहऱ्याला  हानी पोहोचणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1) दूध आणि बेसन पीठाची पेस्ट बनवा आणि ती चेहरा आणि मानेत लावा. जेव्हा ही पेस्ट सुकून जाईल, तेव्हा ओल्या हाताने रगडून काढा. यानंतर साध्या पाण्याने धुवा आणि त्यावर लोशन लावा.


2) एक, एक चमचा बदाम पावडर आणि दुधाचे काही थेंब आणि २-३ निंबुच्या थेंबाचा रस बनवा आणि पेस्ट तयार करा, यानंतर चेहऱ्याला लावा, यानंतर ओल्या हातांनी स्क्रब करा.


3) २ चमचे कॅमलिन पावडर आणि १ चमचा मध आणि काही थेंब गुलाबजल मिसळा, या पॅकला चेहरा आणि मानेत लावा, पुन्हा ओल्या हातांनी साफ करा, यानंतर साध्या पाण्याने धुवून टाका.


4) एलोवेराचा जेल आणि निंबाचा रस मिक्स करून पेस्ट तयार करा, कापसाच्या रूईने जेल चेहऱ्यावर हलकासा रगडा, रंग निघण्यास मदत होईल, हे फक्त अशा वेळेस करा, जेव्हा रंग निघत नसेल.


5) निंबूचे मोठे तुकडे कापा आणि त्याला चेहऱ्याच्या मोठ्य़ा भागावर लावा, जेथे रंग गडद असेल. यात अॅसिटीक अॅसिड असतं, यामुळे चेहऱ्याचा गडद रंग आरामात निघून जातो.


6) थोडंस आंब्याचं पावडर पाण्यात भिजवा, आणि त्याची पेस्ट बनवा. या पेस्टला चेहऱ्यावर लावून सुकवा आणि पुन्हा ओल्या हाताने रगडून साफ करा.