यंदाही मुंबई तुंबणार नाही - उद्धव ठाकरे
गेल्या वर्षी मुंबई तुंबली नाही यंदाही तुंबणार नाही असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांना दिले आहे.
मुंबई : गेल्या वर्षी मुंबई तुंबली नाही यंदाही तुंबणार नाही असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांना दिले आहे.
उद्धव ठाकरे यांनी मुंबई उपनगरातील मान्सूनपूर्व नालेसफाईची पाहणी केली. मिठी नदी, वाकोला नाला, बीकेसी, माहीम, अंधेरी, जोगेश्वरी, या ठिकाणचा उद्धव ठाकरेंनी दौरा केला. शंभर टक्के नालेसफाई होऊच शकत नाही. मात्र पाण्याचा प्रवाह सुरळीत व्हावा यासाठी आवश्यक असलेलं नालेसफाईचं काम सुरु असल्याचं उद्धव म्हणालेत.
ठिकठिकाणी नाल्यांमधला गाळ काढण्याचं काम सुरु असून गाळाचं वजन दाखवल्याशिवाय ठेकेदारांना पैसे मिळणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. नालेसफाईत भ्रष्टाचाराचे आरोप हे केवळ निवडणुकीपुरते होते हे सांगायलाही ते विसरले नाहीत.