मुंबई : म्हाडा इमारतीच्या ३३ (५) पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारने याबाबत नोटीफेकेशन काढले आहे. मुंबई आणि उपनगर म्हाडा जुन्या इमारतीच्या पुनर्विकासाला गती मिळणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 म्हाडा इमारतीच्या ३३ (५) पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाल्याने  दहा हजार पेक्षा जास्त घरांना लाभ मिळणार आहे. २ हजार चौरसमीटर पेक्षा जास्त प्लॉटधारकांना ४ एफएसआय मिळणार आहे. यातून बिल्डर १ एफएसआयची घरे म्हाडाला मिळतील. म्हाडा बिल्डरकडून घर विकत घेणार आहे. 


म्हाडाला यातून बिल्डरकडून ७० हजारापेक्षा जास्त घर  मिळण्याची अपेक्षा आहे.म्हाडा मिळणाऱ्या घऱांची लॉटरी काढली जाईल. अनेक वर्ष म्हाडाच्या जुन्या इमारतीचा पुनर्विकासाचा प्रश्न प्रलंबित होता. महापालिका निवडणुकीआधी सरकारकडून नोटीफेकेशन काढण्यात आले आहे. त्यामुळे भाजपने मुंबई विकासासाठी भाजपने जोर लावल्याची चर्चा आहे.