मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीनंतर केंद्रीय मंत्र्यांना लाल दिव्याची गाडी वापरता येणार नाही असल्याचा मोठा निर्णय़ आज घेतलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रानं लाल दिव्याला तिलांजली दिल्यानंतर राज्यातही हा निर्णय स्वीकारण्यात आलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेचच लाल दिवा वापरणं थाबवंलंय. 


त्यांच्यापाठोपाठ परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनीही लाल दिवा काढण्याचे आदेश दिले. त्यामुळं आता राज्यातल्या मंत्र्यांच्या गाड्यांवरही लाल दिवा दिसणार नाही.  केंद्र सरकार १ मेपासून या निर्णयाची अंमलबजावणी करणार असलं तरी राज्यात तातडीनं अंमलबजावणी होताना दिसतंय. 


केंद्राने हा निर्णय जाहीर केल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तातडीने त्यांच्या गाडीवरील लाल दिवा हटवला.