जलसंधारण खातं काढून घेतल्यानं पंकजा मुंडे नाराज, मुख्यमंत्र्यांनी फटकारलं
जलसंधारण खातं काढून घेतल्यानं ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे चांगल्याच नाराज झाल्यात. या बद्दलची नाराजी त्यांनी ट्विटरवरुनही व्यक्त केली.
मुंबई : जलसंधारण खातं काढून घेतल्यानं ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे चांगल्याच नाराज झाल्यात. या बद्दलची नाराजी त्यांनी ट्विटरवरुनही व्यक्त केली.
सिंगापूरमध्ये सोमवारी जल संधारण परिषद पार पडणार आहे. मात्र आता हे खातं आपल्याकडे नसल्याने तिथे जाणार नसल्याचे ट्विट पंकजा यांनी केले होते.
पंकजा यांच्या या ट्विटला मुख्यमंत्र्यांनी रिप्लाय देत त्यांना कर्तव्याची जाणीव करुन दिलीये. जलसंधारण खात्याचे मंत्री जरी नसलात तरी वरिष्ठ मंत्री म्हणून या परिषदेला हजर राहू शकता अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी पंकजा यांना फटकारलंय.