केंद्राच्या अहवालाचा सेनेकडून गैरवापर - मुख्यमंत्री
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रचारसभा भाजप खासदार किरीट सोमय्यांचा मतदारसंघ असलेल्या मुलुंडमध्ये घेतली.
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रचारसभा भाजप खासदार किरीट सोमय्यांचा मतदारसंघ असलेल्या मुलुंडमध्ये घेतली.
केंद्र सरकारच्या अहवालात मुंबई महापालिकेला मिळालेल्या पहिल्या क्रमांकाची मुख्यमंत्र्यांनी या सभेत चिरफाड केली. शिवसेना या अहावालाचा गैरवापर करत असून पारदर्शकतेच्या निकषावर मुंबई महापालिकेला भोपळा मिळाल्याचा दावा त्यांनी केला.
तसंच उद्धव ठाकरे यांचे सल्लागारच त्यांना गार करून सोडणार असल्याचाही टोला त्यांनी हाणला.
पारदर्शकतेबाबत मुंबईचा क्रमांक तिसरा क्रमांक आहे. हैदराबाद आणि बंगळुरूनंतर मुंबईचा क्रमांक लागतो. त्यातील तिसरा क्रमांकही राज्यसरकारच्या कारभारामुळे लागला आहे. असे चार मुद्दे आहेत त्यात मुंबईला १० पैकी १० मार्क मिळाले आहेत. त्यामुळे मुंबईला पारदर्शकतेमध्ये तिसरा क्रमांक मिळाला आहे.
बाकी इतर पाच पारदर्शकतेच्या मुद्द्यांवर मुंबई महापालिकेला शून्य म्हणजे भोपळा मिळाला आहे, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. उद्धव ठाकरे यांचा दोष नाही, दोष सल्लागारांचा आहे.