मुंबई : 'वेगळा विदर्भ ही भाजपची पहिल्यापासूनची भूमिका पण, सरकारसमोर सध्या वेगळ्या विदर्भाचा प्रस्ताव नाही... मी अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे... जो विषय या सभागृहात झालेले नाही त्यावर चर्चा करणे योग्य नाही' अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्यांना फटकारलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मी अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, त्यामुळे वेगळ्या विदर्भाचा सध्या कोणताही विचार नसल्याचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.


सलग तिसऱ्या दिवशी आज शिवसेना आणि विरोधी पक्षांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. अखंड महाराष्ट्राबद्दल सरकारनं स्वतः प्रस्ताव मांडावा, अशी मागणी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.


आमदार - खासदारांच्या भूमिका वेगवेगळ्या?


तर महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि संसदेत भाजपच्या आमदार आणि खासदारांच्या भूमिका वेगळ्या असतील, तर त्यांनी राजीनामे देऊन पुन्हा निवडून यावं, असं आव्हान राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केलयं.


त्याआधी वेगळ्या विदर्भाच्या घोषणा देणाऱ्या भाजपच्या आमदारांना निलंबित करण्याची मागणी आज शिवसेनेनं केलीय. या मागणीसाठी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केलीय.