मुंबई : महाराष्ट्रातल्या विविध भागातून सध्या थंडी गायब झालीय. गेल्या काही आठवड्यांपासून पडणारी गुलाबी थंडी रविवारपासून अचानक गायब झाली असून पुढचे दोन दिवस ती परत येण्याची शक्यता नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंदमान बेटांच्या दक्षिणेला समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय. त्यामुळं वा-याची दिशा बदलून बाष्पाचं प्रमाण वाढलंय. कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील तापमानही तीन ते पाच अंशांनी वाढलंय.


डिसेंबरमध्ये मुंबईसह राज्यभरातला गारवा वाढतो. मात्र यावेळी बंगालच्या उपसागरावरून येणारं वारं बाष्प घेऊन येत असल्यामुळं दुपारच्या वेळी नागरिकांना अक्षरशः घाम फुटतो आहे. रविवारी मुंबईतल्या सांताक्रुझमध्ये 22.6 अंश सेल्सिअस तर कुलाब्यात 24.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.