तुमच्या हातात खरी नोट आहे की `कलर झेरॉक्स`?
बाजारात नवी आलेली दोन हजारांची नोट नीट तपासून घ्या.... कारण या नोटेची कलर झेरोक्स कॉपी अगदी नोटेसारखीच तंतोतंत दिसते.
मुंबई : बाजारात नवी आलेली दोन हजारांची नोट नीट तपासून घ्या.... कारण या नोटेची कलर झेरोक्स कॉपी अगदी नोटेसारखीच तंतोतंत दिसते.
त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता आहे. तुमच्या हातात असलेल्या नोटेचे सुरक्षेसाठीचे असलेले सर्व फिचर्स तपासून पाहा. या बनावट नोटा 'कलर कॉपिंग मशिन'च्या साहाय्याने बनविण्यात येत असल्याचं निदर्शनास येतंय.
परंतु, उल्लेखनीय म्हणजे बनावट नोटेचं मूळ नोटेशी साधर्म्य असलं तरी सुरक्षेच्या दृष्टीने असलेले प्रमुख घटक या नोटेमध्ये नाहीत.