मुंबई : मर्जीने ठेवलेला शरीर संबंध बलात्काराच्या कक्षेत येत नाही, असं मत मुंबई उच्च न्यायालयाचे व्यक्त केलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोलापूरातील २५ वर्षीय तरुणाला बलात्कार प्रकरणी जामीन मंजूर करताना उच्च न्यायालयाने हे मत नोंदवलं आहे.


या प्रकरणातील आरोपीचे एका २४ वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध होते आणि त्यातून तिला गर्भपात करावा लागला. मात्र, पुढे त्यांच्यात दुरावा निर्माण झाला आणि तिने त्या तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी आरोपीने जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. 


शरीरसंबंध ठेवल्यानंतर होणाऱ्या परिणामाची पूर्ण कल्पना शिक्षित आणि सज्ञान महिलेला असते. त्यामुळे मर्जीने ठेवलेला शरीर संबंध बलात्काराच्या कक्षेत येत नाही, असं मत मुंबई उच्च न्यायालयाचे व्यक्त केलंय.