मुंबई : गुरुदास कामत यांनी राजीनामा दिल्यानंतर मुंबई काँग्रेसमध्ये जोरदार घमासान सुरू झालंय. मुंबई महापालिकेतल्या २५ नगरसेवकांनी राजीनामे देण्याची तयारी केली आहे. कामतांनी घेतलेल्या संन्यासाचा निर्णय मागे घ्यावा अशी या नगरसेवकांची मागणी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या काळात मुंबई काँग्रेसचे 17 पदाधिकारी देखील राजीनाम्याच्या तयारीत आहे. आज आझाद मैदानाच्या जवळ कामत समर्थकांचं आंदोलनही होणार आहे. कामतांच्या राजीनाम्यानं मुंबई काँग्रेसमध्ये चांगलचं वादळ आलंय. हे शमवण्यासाठी दिल्लीहूनही प्रयत्न सुरू झाला आहे.


मुंबई महानगरपालिका निवडणुका तोंडावर आल्या असतानाच मुंबई काँग्रसमधील संघर्ष उघडपणे समोर आला आहे. शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या निरुपम यांचे मुंबई काँग्रेसमधील महत्त्व वाढल्याने जुने काँग्रेसचे पदाधिकारी आणि नेते नाराज आहेत.