मुंबई : संगीता शेट्टी आणि सुनिल शेट्टी या जोडप्यानं इतिहास रचलाय. या जोडप्यानं सतत 24 तास धावण्याचा रेकॉर्ड केलाय. त्यांच्या या कामगिरीची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सतत 24 धावणारं हे भारतातील पहिलं जोडपं ठरलंय. 24 तासांमध्ये संगीता यांनी 120 तर सुनील यांनी 138 किलोमीटर अंतर धावून पार केलं. त्याचप्रमाणे 100 किलोमीटर धावणारही हे पहिलं भारतीय जोडपं असून याचीदेखील नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. 


संगीता 49 वर्षांच्या आहेत तर सुनील हे 54 वर्षांचे आहेत. संगीता या गृहिणी असून एक मुलगी झाल्यानंतर त्यांनी फिटनेससाठी धावायला सुरुवात केली आणि मग धावणं हे त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला.या जोडप्याला आता नवा विक्रम खुणावतोय. तो म्हणजे सतत 36 तास धावण्याचा.