मुंबई : सर्जिकल स्ट्राइक कुठल्याही राजकीय पक्षांनी नव्हे तर आपल्या देशाच्या सैनिकांनी पार पाडले आहे. त्यामुळे टीका करणाऱ्यांनी पहिल्यांदा 'सर्जिकल' व्हावं अशी टीका संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी केली. ते मुंबईत बोलत होते. तसंच याआधी कधीही सर्जिकल स्ट्राइक झाले नसल्याचंही त्यांनी म्हटले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्यांदाच सर्जिकल स्ट्राइक केल्याचा दावा केल्यामुळे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘मी दोन वर्षांपासून संरक्षणमंत्री आहे. सर्जिकल स्ट्राइक प्रकारात बसणारी लष्करी कारवाई याआधी भारताने कधीही केल्याची माहिती माझ्यापर्यंत आलेली नाही. उरी हल्ल्यानंतर केलेली लष्करी कारवाई हाच भारताचा पहिला सर्जिकल स्ट्राइक आहे, अशा स्वरुपाचा दावा पर्रिकरांनी केला आहे.



नवी मुंबई येथील मटेरिअल्स इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी या विषयावरील परिषदेत बोलताना पर्रीकर यांनी सर्जिकल स्ट्राइक संदर्भातला नवा दावा केला. ‘सर्जिकल स्ट्राइकचे श्रेय संपूर्ण देशाला द्यावे लागेल. देशातील सर्व नागरिकांना द्यायला हवे. मात्र जास्त प्रमाणात हे श्रेय पंतप्रधान मोदींना द्यावे लागेल, असे पर्रिकर म्हणालेत.


दरम्यान, संरक्षणमंत्री या नात्याने सर्जिकल स्ट्राइकचे थोडे श्रेय मलाही द्यावे लागेल, अस मला वाटतं, माझ्या या भूमिकेला अनेकांचे समर्थन मिळेल, असेही व्यक्तव्य पर्रिकरांनी या परिषदेत केले.