मुंबई : पवईच्या तलावातील मगरीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाचा व्हायरल होतोय. आकाश शिंदे या तरुणाने हा व्हिडीओ अपलोड केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आकाश २३ फेब्रुवारीला नेहमीप्रणाणे मुलुंड येथून मरोळ येथे त्याच्या घरी परतत असताना पवईच्या तलावात त्याला एक मगर आढळली. सुरुवातीला त्याचा यावर विश्वासच बसत नव्हता. 


या मगरीला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी आकाश घरी गेला आणि कॅमेरा घेऊन पुन्हा तलावाजवळ परतला. यादरम्यान ती मगर तेथेच असावी अशी त्याची प्रार्थना सुरु होती. त्याचे सुदैव म्हणजे तासाभरानंतरही मगर तेथेच होती. मग काय आकाशने याचे पूर्ण चित्रण आपल्या कॅमेऱ्यात केले आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय. 


पवई लेकच्या येथून बस जात असताना माझी नजर नारळाच्या झाडाखाली ऊन खात असलेल्या मगरीवर पडली. मी जेव्हा घरी पोहोचलो तेव्हा लगेचच कॅमेरा घेतला आणि पुन्हा तलावाजवळ आलो. आकाशने या मगरीचा केवळ व्हिडीओच काढला नाही तर अनेक फोटोजही काढलेत.