दहीहंडीबाबत निर्णयाचा मुंबईत अनेक ठिकाणी निषेध
दादारमध्ये अनोख्या पद्धतीनं दहीहंडीचे थर लावण्यात आले. गोविंदा मंडळांनी कोर्टाच्या आदेशांचं पालन करत उंचावर थर न लावता चक्क झोपून थर लावले.
मुंबई : दादारमध्ये अनोख्या पद्धतीनं दहीहंडीचे थर लावण्यात आले. गोविंदा मंडळांनी कोर्टाच्या आदेशांचं पालन करत उंचावर थर न लावता चक्क झोपून थर लावले.
दादरमध्ये कोर्टाच्या आदेशाचा मान राखत चक्क शिडी लावून हंडी फोडण्यात आला. गोविंदामध्ये या 20 फुटीच्या थराच्या मर्यादेच्या निर्णयामुळे नाराजी आहे. पण नाराजीच्या निषेधाचा आनंदी मार्ग स्विकारत अभिनव प्रकारे दहीहंडी फोडण्यात आली. अवघ्या गोविंदामध्ये या शिडी हंडीची जोरदार चर्चा आहे.