मुंबई : कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला अडचणीत आणण्यासाठी तसेच कमजोर करण्यासाठी एक मास्टर प्लॅन आखला होता. त्यानुसार धार्मिक तेढ करण्यासाठी चर्चवर हल्ले करण्याचा कट होता. मात्र, हा कट यशस्वी झाला नाही.


जातीय तणाव वाढवा...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात सामाजिक अस्थिरता निर्माण व्हावी, जातीय तणाव वाढावा यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते तसंच चर्च यांच्यावर हल्ले करण्याचा कट दाऊद इब्राहिमच्या 'डी कंपनी'ने आखला होता, असा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) केलाय.


यांच्यावर जबाबदारी


डी कंपनीने यासाठी आपल्या दहा लोकांवर ही जबाबदारी सोपवली होती. धार्मिक नेत्यांसोबतच संघाचे नेते आणि चर्चेवर  हल्ले करण्याचे आदेश त्यांना देण्यात आले होते. एनआयए या दहा जणांविरोधात चार्जशीट दाखल करणार आहे. विशेष म्हणजे,  २०१४मध्ये केंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर हा कट रचण्यात आलाय.
 


यांच्यावर हल्ले करण्याचा आदेश



डी कंपनीचे सदस्य पाकिस्तानमधील जावेद चिकना आणि दक्षिण अफ्रिकेतील झाहीद मियान तथा जाओ या हत्येचे मास्टरमाइंड असल्याचं समोर आल्याचे एनआयएने केलेल्या तपासाच पुढे आले. इतकच नाही तर त्यांनी भारतात मोठ्या प्रमाणात जातीय तणाव वाढावा यासाठी संघाचे नेते आणि चर्चवर हल्ले करण्याची योजना आखली होती.  


इंटरपोलशी संपर्क  


जावेद चिकनाला पकडण्यासाठी एनआयएने इंटरपोलशी संपर्क साधला आहे. त्याला अटक करुन भारताच्या हवाली करण्याची विनंती केली आहे. तसंच पाकिस्तान, नेपाळ, दक्षिण अफ्रिका, सौदी अरेबिया, अमेरिका आणि दुबई या देशांना न्यायालयीन विनंती तसंच म्युच्युअल कायदेशीर सहाय्य मान्यता करार विनंती पाठवली आहे.